सागर सावंत मित्रमंडळ पुरस्कृत 'आमची वाडी देऊळवाडी' आयोजित खुल्या नरकासुर २०२३ स्पर्धेचे आयोजन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील ‘आमची वाडी देऊळवाडी’ आयोजित व सागर सावंत मित्रमंडळ पुरस्कृत नरकासुर स्पर्धा २०२३ आयोजित करण्यात आली आहे. नरक चतुर्दशी निमित्त ११ नोव्हेंबरला रात्री ८ ते १० या वेळेत बांदा येथील बांदेश्वर मंदिर येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे. नरकासुर स्पर्धे दरम्यान अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम पण ह्या वर्षी होणार आहेत.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १०,०००/-, द्वितीय पारितोषिक ५०००/-, तृतीय पारितोषिक २०००/- चतुर्थ पारितोषिक १०००/- आणि पाचवे पारितोषिक १०००/- अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी अक्षय मयेकर – ९५०३८७१९२४ आणि संकेत वेंगुर्लेकर – ९०१११०७५६२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सागर सावंत सावंत यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)