पळसंब डिगीवाडी येथील श्री नामदेव केशव उर्फ भाऊ तेजम यांचे निधन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवातील डिगीवाडीचे रहिवासी श्री नामदेव केशव उर्फ भाऊ तेजम यांचे काल १७ ऑक्टोबरला संध्याकाळी ४:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मुलुंड येथील आदिती हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात भाऊ , पत्नी, मुलगा व मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने पळसंब परिसरात शोक व्यक्त होत असून
पळसंब ग्रामस्थ व मुंबई स्थित पळसंब वासियांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)