ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गोळवण येथे सभामंडप कामाचा शुभारंभ ; आदर्श गांव योजने मधील प्रेरक अनुदानातून बांधकाम होणार असल्याची सरपंच सुभाष लाड यांची माहिती.

गोळवण येथे सभामंडप कामाचा शुभारंभ ; आदर्श गांव योजने मधील प्रेरक अनुदानातून बांधकाम होणार असल्याची सरपंच सुभाष लाड यांची माहिती.

प्रकाशन: 18 Oct 2023 10:00 AM
वाचन संख्या 127

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल या आदर्श गांव योजने मधील प्रेरक अनुदानातून ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल कार्यालयासमोर सभामंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समिती मालवण चे गटविकास अधिकारी उच्च स्तर वर्ग-१ आपासाहेब गुजर , तालुका कृषि अधिकारी श्री. विश्वनाथ गोसावी, आदर्श गांव संस्था अध्यक्ष श्री. मंगेश सावंत यांच्या उपस्थितीत झाला. हे काम आदर्श गांव योजने अंतर्गत मंजूर काम असून कामाची अंदाजपत्रकिय रक्कम ९ लाख २५ हजार तर श्रमदान रक्कम २ लाख ३१ हजार एवढी आहे.

सदर कार्यक्रमाला सरपंच सुभाष लाड, कृषि पर्यवेक्षक श्री. सावंत , ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, श्रीम. एकादशी गावडे, ग्रामसेविका श्रीम. अर्पिता शेलटकर तसेच गोळवण, कुमामे, डिकवल येथील ग्रामस्थ श्री. नंदादीप नाईक, श्री. नारायण परब, श्री. प्रल्हाद नाईक, श्री. विठ्ठल तळवडेकर, श्री. प्रकाश चिरमुले, श्री. बाबुराव चिरमुले, श्री. कुसाजी तेजम, श्री. सुहास घाडी, श्री. सत्यवान चव्हाण, श्री. मिलिंद पवार, सौ. प्रज्ञा चव्हाण, श्री. दाजी पाताडे, श्री. संजय पाताडे, श्री. जनार्दन गावडे, श्री. गजानन गावडे, श्री. श्रीकृष्ण तेली, श्री. नामदेव कुमामेकर, गांवातील शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, कामाचे मक्तेदार श्री. विजय पालव, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील सुमारे १०० ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स