ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'भाग निधी भाग' ; रोझरी इंग्लिश स्कूलची कु. निधी चंदन कांबळी करणार विभागीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व..!

'भाग निधी भाग' ; रोझरी इंग्लिश स्कूलची कु. निधी चंदन कांबळी करणार विभागीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व..!

प्रकाशन: 17 Oct 2023 02:38 PM
वाचन संख्या 382

ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूलची कु. निधी चंदन कांबळी व वेदांत कुर्ले यांची चमक..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. १३ व १४ ऑक्टोबरला ओरोस येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये गोळाफेक या प्रकारात रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये कु. वेदांत कुरळे याचा तिसरा क्रमांक आला. १०० मी. धावणे या प्रकारामध्ये मधील कु. निधी चंदन कांबळी हिने पहिला क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी आता ती विभागाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. मालवणचे क्रीडा समन्वयक अजय शिंदे सर यांनी तिला गुलाबपुष्प देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कु. निधी कांबळी व वेदांत कुरळे यांना लाभलेले क्रीडा शिक्षक तसेच पालक यांची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्सालविस यांनी देखील त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मालवण तालुक्यातील चौके गांवानजिकच्या आंबेरी सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून येऊन घवघवीत यश मिळवणार्या कु. निधी चंदन कांबळी हिची ॲथलेटीक्स मधिल ही कामगिरी सध्या कौतुकाचा विषय आहे. तिच्या आगामी स्पर्धांसाठी तिची दौड अशीच चालू रहावी म्हणून तिच्या यासाठी तिच्या शाळेतील सर्वजण, ” भाग निधी भाग..” अशाच शुभेच्छाही देत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स