ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
फ्लॉरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली येथे फॅशन डिझायनिंग शॉर्ट टर्म कोर्सचा प्रारंभ.

फ्लॉरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली येथे फॅशन डिझायनिंग शॉर्ट टर्म कोर्सचा प्रारंभ.

प्रकाशन: 17 Oct 2023 11:28 AM
वाचन संख्या 44

मसुरे | प्रतिनिधी : कोकणातील एकमेव नोकरी देणारे फॅशन व इंटेरिअर डिझायनिंग कॉलेज अशी ख्याती असणार्या ‘फ्लोरेट कॉलेज, कणकवली’ येथे खास नोकरदार वर्ग, महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी ३ महिन्यांच्या फॅशन डिझायनिंग बॅचचा स्वागत समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्पिता मुंबरकर उपस्थित होत्या.

फॅशन जगत हे खूप मोठे आहे. ही कला कायमस्वरूपी रोजच्या जीवनात उपयोगात येतच राहते. शिवणकाम तसेच व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांनी नक्की ह्या कोर्सचा फायदा घ्यावा असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. तसेच अनुभवी फॅकल्टी साक्षी खोपडकर व ऋतुजा नेरूरकर यांनी पूर्ण कोर्सच्या विषयांची माहिती महिलांना दिली. इलस्ट्रेशन , डिझायनिंग प्रोसेस, पॅटर्न मेकिंग, एम्ब्रोडरी, कुर्ता,सलवार,ब्लाऊज डिझायनिंग ह्या कोर्स मध्ये समाविष्ट आहे.३ महिन्यांमध्ये ज्युनिअर फॅशन डिझायनर होण्याची संधीचा सर्वांनी अवश्य फायदा घ्यावा असे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग कणकवली कॉलेज चे आवाहन आहे. सर्वांचे आभार अधिश्री तीवरेकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स