ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
गणित ऑलिम्पिक स्पर्धेत मसुरे देऊळवाडा शाळा तालुक्यात ठरली अव्वल..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गणित ऑलिम्पिक स्पर्धेत मसुरे देऊळवाडा शाळा तालुक्यात ठरली अव्वल..!

प्रकाशन: 17 Oct 2023 11:36 AM
वाचन संख्या 111

अध्ययन संस्था, मुंबई आणि शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय स्पर्धा.

मसुरे | प्रतिनिधी : अध्ययन संस्था, मुंबई आणि शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवण तालुकास्तरीय गणित ऑलिंपिक स्पर्धेत मसुरे देऊळवाडा शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

अध्ययन संस्था, मुंबई ही संस्था जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणित विषयातील विविध संबोध स्पष्ट करण्यासाठी विविध अध्यापन साहित्याचा पुरवठा करुन शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यानंतर विद्यार्थ्यांची लेखी चाचणी व मौखिक प्रश्नमंजुषा घेतली जाते. इयत्ता ६ वी व ७ वीच्या विद्यार्थ्यांची मापन या घटकावर मालवण तालुकास्तरीय ऑलिंपिक स्पर्धा सेवांगण मालवण येथे संपन्न झाली. यात मसुरे देऊळवाडा शाळेतील दहा विद्यार्थी सहभागी झाले होते. यशश्री ताम्हणकर, स्वराज बागवे, नील बागवे, रुद्र परब, सेजल काळसेकर, तेजस्वी मेस्त्री, दुर्वा परब, युवराज परब, आर्या भोगले, दुर्वा मेस्त्री या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा व प्रश्नमंजुषा स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.

यशस्वी विद्यार्थ्यांना अध्ययन संस्था व शिक्षण विभागाच्या वतीने संयोजक सामंत, मार्गदर्शक व शिक्षक यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, शिक्षक व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स