ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
क्रीडा प्रसारक श्री अशोक दाभोलकर - मेस्त्री व शशिकांत गवंडे 'प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३' ने सन्मानित.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

क्रीडा प्रसारक श्री अशोक दाभोलकर - मेस्त्री व शशिकांत गवंडे 'प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३' ने सन्मानित.

प्रकाशन: 17 Oct 2023 06:44 AM
वाचन संख्या 205

मसुरे | प्रतिनिधी : भारतीय वायुसेना दिवसाचे औचित्य साधून कर्तव्यम प्रेरणा फाऊंडेशन, पुणे व शंभूराज्याभिषेक ट्रस्ट ह्यांच्या विद्यमाने श्री संतोषभाऊ वारणे ह्यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे आयोजित केलेल्या १५ व्या अखिल भारतीय कर्तव्यम प्रेरणा महासम्मेलन २०२३ मध्ये युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या माता, पत्नी तसेच विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्र तसेच ग्रामीण भागातील पालक व विद्यार्थ्यांना व्यक्तीगत चर्चासत्र तसेच लेखणीतून क्रीडा संस्कृती प्रबोधन तसेच ग्रामीण भागातील माताभगिनी सामाजिक क्षेत्रात पुढे याव्यात यासाठी गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवित निःस्वार्थपणे काम करणारे दाभोली वेंगुर्लाचे क्रीडा संस्कृती प्रसारक श्री अशोक गणेश दाभोलकर -मेस्त्री ह्यांना कारगिल युद्धात भीमपराक्रम करून भारतीय सेनेचा मानाचा महावीर चक्र पुरस्कार प्राप्त कमांडो श्री. दिगेंद्र कुमार यांच्या हस्ते ‘प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३ ने’ फेटा, मानपत्र तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

तसेच त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करून स्पर्धा आयोजन, पंच व मार्गदर्शक आदी विविध अंगाने खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून गेली कित्येक दशके झोकून काम करणारे उभादांडा वेंगुर्ल्याचे शशिकांत आत्माराम गवंडे ह्यांना श्री. कृष्ण प्रसाद ( IPS, ADGP) ह्यांचे शुभहस्ते फेटा, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन ‘प्राईड ऑफ भारत पुरस्कार २०२३ ने ‘ गौरविण्यात आले.

वीरमरण आलेल्या जवानांना पुष्पचक्र व मानवंदना देत सैनिकी शिस्त व सैनिकी वातावरणात अतिशय सुंदरपणे संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमात श्री. संजीव जैन ( संचालक जी -२०, नवी दिल्ली, भारत सरकार), ब्रिगेडीयर श्री. राजेश गायकवाड, श्री. अतुल जे. निकम ( संचालक- नेहरू क्रीडा केंद्र, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), महाराजा श्री शिवाजी जाधव, महाराजा श्री. विजयसिंह राजेभोसले , तंजावर), एअर मार्शल श्री. भुषण गोखले- भारतीय वायुसेना, एअर मार्शल श्री. प्रदिप बापट- भारतीय वायुसेना, एअर मार्शल श्री नितीन वैद्य – भारतीय वायुसेना, महावीर चक्र विजेते श्री दिगेंद्र कुमार – भारतीय सेना, श्री. सुनील पवार ( अप्पर आयुक्त तथा संचालक -=सहकार} , महाराष्ट्र), डॉ. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते व त्यांच्या शुभहस्ते शहीद जवानांच्या माता- पत्नी तसेच अन्य कार्यवीरांना सन्मानित करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव तसेच संपादन, प्रतिथयश लेखक व मुख्य संयोजक क्रांती महाजन यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स