ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोकण रेल्वे सोडणार २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर जादा विशेष रेल्वे ; दिवाळसणाचे औचित्य.

कोकण रेल्वे सोडणार २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर जादा विशेष रेल्वे ; दिवाळसणाचे औचित्य.

प्रकाशन: 15 Oct 2023 09:31 AM
वाचन संख्या 158

संतोष साळसकर | सहसंपादक : कोकण रेल्वने दिवाळ सणासाठी यंदा जादा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेण्यात आला. २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत या विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनल ते मंगळुरू जंक्शन (०११८५) ही विशेष साप्ताहिक गाडी २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी रात्री १०:१५ वाजता मुंबईहून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:०५ मिनिटांनी मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनल (०११८६) ही विशेष साप्ताहिक गाडी २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६:४५ वाजता मंगळुरू स्थानकातून सुटणार आहे.

गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २:२५ वाजता लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचणार आहे. दोन्ही मार्गांवरून धावणाऱ्या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम येथे थांबेल. मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबतील, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स