ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राष्ट्रवादी काँग्रेस बांदा शहर (शरद पवार गट) युवती अध्यक्षपदी सुनिता भाईप यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस बांदा शहर (शरद पवार गट) युवती अध्यक्षपदी सुनिता भाईप यांची निवड.

प्रकाशन: 14 Oct 2023 08:52 AM
वाचन संख्या 169

माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा शहर राष्टवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट ) युवती शहर अध्यक्ष पदी सुनीता भाई यांची निवड झाली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)अध्यक्षा अर्चना घारे – परब यांच्या प्रेरणेतून सुनिता भाईप या गेली चार वर्षे राजकारण व समाजकारणात सक्रीय आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर यांनी त्यांची या पदासाठी शिफारस केली होती. राष्ट्रवादी युवती काॅग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी युवती काॅग्रेस प्रदेश अध्यक्षा कु. सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने सुनीता संजय भाईप यांची बांदा शहर युवती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

सावंतवाडी रविंद्र मंगल कार्यालयात आयोजीत जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निरीक्षक शेखर माने, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्षा सायली पाटकर, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स