ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार नितेश राणे यांचा एक फोन काॅल आणि अनेक प्रवासी व विद्यार्थ्यांचे टळले हाल..!

आमदार नितेश राणे यांचा एक फोन काॅल आणि अनेक प्रवासी व विद्यार्थ्यांचे टळले हाल..!

प्रकाशन: 13 Oct 2023 09:28 PM
वाचन संख्या 251

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटणसून सुटणारी भुईबावडा एसटी बस ही गेले काही दिवस वेळेवर येत नसल्याने प्रवासी विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. खारेपाटण मधून भुईबावडा एसटी बस फेरीची वेळ ही दुपारी १२:४५ ची असून देखील ही बस गेले काही दिवस दुपारी ३ च्या नंतर खारेपाटण बसस्टँड ला येत येत होती. त्यामुळे या बस ने प्रवास करणारे प्रवासी व कॉलेज चे विद्यार्थी यांची फारच पंचाईत होत होती .

हा प्ररकार देवगड – कणकवली- वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांना कळताच त्यांनी एसटी महामंडळ अधिकार्यांना एक फोन कॉल करून भुईबावडा एसटी खारेपाटण स्टॅन्ड ला नियमितपणे वेळेत पाठवण्याचे ‘आदेश’ दिले. त्यानुसार भुईबावडा बस ही यापुढे खारेपाटण स्टॅन्ड ला वेळेवर पाठवून प्रवासी व विद्यार्थ्यांचे होणारे हाल दूर करण्याचे आश्वासन एसटी च्या विभागीय नियंत्रकानी आमदार नितेश राणे यांना दिले. खारेपाटण येथून सुटणारी भुईबावडा एसटी वर अनेक प्रवासी विद्यार्थी अवलंबून आहेत. खारेपाटण पासून भुईबावडा व भुईबावडा मार्गावरची सर्व गांवे ही खारेपाटण पासून लांब असल्याने, खारेपाटण येथून सुटणारी दुपारची खारेपाटण भुईबावडा बस ही विद्यार्थी व प्रवासी यांच्यासाठी महत्त्वाची बस आहे. आमदार नितेश राणे यांनी तत्परतेने एसटी च्या विभागीय नियंत्रकांना फोन काॅल करून खारेपाटण भुईबावडा बस ही नेहमी वेळेत खारेपाटण स्टॅन्ड ला आली पाहिजे असे सक्त आदेश दिल्याने आता ही बस वेळेवर खारेपाटण स्टॅन्डला येणार असल्याचे समजल्याने प्रवासी व विद्यार्थी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

‘आमदार नितेश राणे यांचा एक फोन काॅल आणि प्रवासी व विद्यार्थ्यांचे टळले हाल’ अशीच प्रतिक्रिया अनेकांनी या घटनेबद्दल व्यक्त करत आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स