सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे ३ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवाना ; उपनिरीक्षक सूरज पाटील यांची अटक टळली..
सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पोलीस ठाण्यात १ लाखाची लाच स्वीकारताना रायगड लाचलुचपत विभागाने अटक केलेला सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना ३ दिवसांचो पोलिस कोठडी मंजूर झाली तर पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील मंत्र्यांच्या दौऱ्यातून काल गुरूवारी रात्री सावंतवाडीत आल्यावर रूग्णालयात दाखल झाले असल्याने त्यांची अटक तूर्तास टळली आहे. पाटील यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना १ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी रायगड येथील लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्याला आज जिल्हा मुख्यन्यायदंडाधीकरी न्यायालयात हजर केल्यावर १६ ऑक्टोबर पर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. रायगड लाचलुचपत विभागाने सदरच्या प्रकरणाचा तपास सिंधुदुर्ग जिल्हा लाच लुचपत विभागाच्या पथकाकडे सोपविला आहे. या प्रकरणात आणखी एक पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांचा यात समावेश आहेत. त्यांच्या वर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ते काल गुरूवारी मंत्र्यांच्या दौऱ्यात होते. ते रात्री आले पण प्रकृती खालावल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले.आज त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांची अटक कारवाई लांबणीवर गेली आहे. श्री पाटील हे लाच लुचपत विभागाच्या रडारावर होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावली आहे असे बोलले जात आहे. मात्र लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असा विश्वास जिल्हा लाच लुचपत विभागाचे उपविभागीय अधीक्षक श्री .पवार यांनी दिली. सध्या पोलीस कोठडीत असलेले श्री खंडागळे यांची कसून चौकशी सुरू आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिस ठाण्यात पोलीसाचा हात धरला काल गुरूवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांना १ लाख रूपयांची लाच तक्रारदार बिल्डर सिध्दांत परब यांनी ठरल्याप्रमाणे दिली. पोलिस कोठडीच्या जवळपास ही लाच दिली तेव्हा हातचलाखी करून तेथे असलेल्या गोणपाटाखाली सागर खंडागळे यांने एक लाख लपवून ठेवले. तेवढ्यात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे आणि पथक दाखल झाले. १ लाख रुपये सापडेना! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पावडर लावून एक लाख रूपयांची लाच तक्रारदार बिल्डर सिध्दांत परब यांच्या करवी सागर खंडागळे यांना पोहोच केली. पण खंडागळे यांनी शिताफीचे प्रदर्शन करून गोणपाटाखाली रक्कम लपविली होती. ती या पथकाला मिळाली नाही. जवळपास दहा मिनिटे शोधाशोध झाली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथक हबकून गेले होते. मात्र हाताला पावडर असलेला पुरावा आढळून आला होता. शोधाशोध केल्यावर ती रक्कम गोणपाटाखाली सापडून आली होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)