आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला (उ.बा.ठा ) खिंडार ; माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर भाजपात दाखल.
मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या प्रतिष्ठेच्या आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. आचरा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर आणि सौ. वायंगणकर हे भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले असून आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक समिकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहे.
या पक्ष प्रवेशावेळी मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, माजी जि. प. सदस्य जेरॉन फर्नाडिस, संतोष कोदे, संतोष गांवकर, अवधूत हळदणकर, मंगेश गांवकर, सचिन हडकर यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो सौजन्य | मालवण ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)