बांदा शहरातील वीज वाहिन्यांवर असलेली धोकादायक झाडे तोडण्याबाबत रियाज़ खान यांचे निवेदन.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातल्या वीज वाहिन्यांवर असलेली धोकादायक झाडे तोडण्याबाबचे
निवेदन नुकतेचे बांदा ग्रामपंचायतचे उपसरपंच जावेद ख़तीब यांच्या कडे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे ( उ.बा ठा.) अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज़ ख़ान यांनी दिले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की बांदा शहरात वर्दळीच्या अनेक ठिकाणी धोकादायक झाडे असून ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या झाडांचाया लगतच महावितरणची वीज वाहक लाईन जात असल्याने झाडं कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता
येत नाही. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी शहरात झाड कोसळून वीज वाहक तारांचा स्पर्श झाल्याने दोघे तरूण दगावल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर भविष्यात बांदा शहरात अशा दुर्घटना टाळण्यासाठी या झाडांची तोड करणे हे अत्यंत गरजेचे आहे. शहरात ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने सर्वे करून अशा धोकादायक झाडांची यादी बनवून त्यांची तोड करावी. शहराचा सर्वे करताना महावितरणाच्या अधिकाऱ्यांना देखील सोबत घ्यावी. पाऊस संपल्या नंतर तात्काळ व गांभीर्याने यावर उपाययोजना करण्यात यावी असे त्या निवेदन मध्ये म्हटले आहे.
यावेळी रियाज़ ख़ान यांच्या सोबत, पप्या सावंत, मुख़्तार शेख़
श्रीकांत धोत्रे, सागर धोत्रे, अक्षर ख़ान, दिगंबर आईर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)