भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेरनिवड ; भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले नियुक्ती पत्र.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन वर्ष भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असणारे श्री नवलराज काळे यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी भाजप जिल्हा कार्यालयात निवडीचे पत्र दिले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी बाळा गोसावी, आमदार निरंजन डावखरे यांचे निकटवर्तीय वैभव साटम, श्री भामरे जिल्हा कार्यालय संपर्कप्रमुख समर्थ राणे वैभव दळवी व इतर उपस्थित होते. नवलराज काळे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)