ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजप नेते व माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने किर्लोस- गोठणे पुलासाठी २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजप नेते व माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने किर्लोस- गोठणे पुलासाठी २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर..!

प्रकाशन: 13 Oct 2023 08:47 AM
वाचन संख्या 188

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ – मालवण मतदार संघात भाजप नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणे यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांपासूनची मागणी असलेल्या तसेच कणकवली व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या किर्लोस चव्हाणवाडी ते गोठणेमाळ होडीचे साने ‘ग्रामीण मार्ग ४५८’ या रस्त्यावरील पुलासाठी नाबार्ड अंतर्गत २७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

हे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतल किर्लोस ते गोठणे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रवास करणे सोयीचे होणार आहे. किर्लोस व गोठणे रामगड पंचक्रोशीतील लोकांकडून या पुलासाठी अनेक वर्षांची मागणी होत होती. किर्लोस ग्रामस्थांनी भाजपा नेते डाॅ निलेश राणे यांचे या विषयावर लक्ष वेधल्यानंतर निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस चव्हाणवाडी ते गोठनेमाळ मार्गे होडीचे साने ग्रा. मा. ४५८ किमी. ९/१०० येथे नवीन पूल बांधणे या कामासाठी सत्तावीस कोटी पन्नास लक्ष एवढ्या निधीची मागणी केली होती त्यानुसार निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

किर्लोस-गोठणे पुलासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगांवकर, सामाजिक कार्यकर्ते दिपक जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेश ऊर्फ गजू बाक्रे, बाळा ऊर्फ अर्जुनलाड, सतीश नलावडे, प्रकाश भावे, भाजपचे सोशल मीडिया मालवण तालुका संयोजक शुभम बाक्रे तसेच भाजप युवा मोर्चाचे अभिमन्यू लाड, विनोद भावे, गोठणे सरपंच सौ. दीप्ती हाटले यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स