साळशी - तेलीवाडी येथील सौ. मंदाकिनी साळसकर यांचे निधन.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या साळशी येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक सौ. मंदाकिनी पांडुरंग साळसकर ( ८३ ) यांचे हृदविकाराने आज गुरुवारी १२ ऑक्टोबरला पहाटे २ वाजता कुडाळ तालुक्यातील माणगांव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, २ मुलगे, २ मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अन्न महामंडळाचे सेवानिवृत्त प्रबंधक पांडुरंग साळसकर यांच्या त्या पत्नी तर इतर मागास महामंडळ व दिव्यांग महामंडळ चे सेवानिवृत्त जिल्हा व्यवस्थापक तथा विविध आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक नंदकिशोर साळसकर व मुंबई येथील भविष्य निर्वाह निधीचे सेवानिवृत्त अधिकारी हेमचंद्र साळसकर यांच्या त्या मातोश्री होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)