ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनने वीज समस्यांचा निराकारणासाठी करवून घेतला 'स्पाॅट सर्व्हे' ; वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले होते लेखी निवेदन.

कणकवलीत ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनने वीज समस्यांचा निराकारणासाठी करवून घेतला 'स्पाॅट सर्व्हे' ; वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले होते लेखी निवेदन.

प्रकाशन: 12 Oct 2023 05:53 AM
वाचन संख्या 269

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्युमन राईट असोसिएश फॉर प्रोटेक्शनच्या वतीने काल ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. बाळासाहेब मोहिते यांना कणकवलीतील वीज समस्यां बाबत निवेदन देण्यात आले. कणकवली शहरातील परब वाडी, शिवाजी नगर, जळके वाडी, पिळणकर वाडी, २ नंबर शाळा, मावूनमळा येथे गेले ३ ते ४ महिने कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे विद्युत ग्राहकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त व खराब झाली आहेत. ताबडतोब स्पाॅट सर्व्हे करून वरील सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले. कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार उपकार्यकारी अभियंता विलास बगडे व कणकवली शहराचे विद्युत अभियंता श्रीराम शिंदे यांनी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या समवेत स्पाॅट सर्वे केला.

तसेच सातरल वरची वाडी येथील नंदकुमार राणे यांच्या घराजवळून लाईन गेल्या मुळे पावसाळ्यात घरामध्ये वीज करंट जाणवत आहे. या वर ताबडतोब कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच कणकवली, देवगड, मालवण, वैभववाडी तालुक्यातील जे उघडे डिपी आहेत, त्यांना लवकरात लवकर दरवाजा बसविण्यात येईल असे आश्वासन दिले.

निवेदन देताना उपस्थित ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफ़भाई पीरख़ान, तालुका अध्यक्ष सौ. संजना सदडेकर , उपाध्यक्ष सदाशिव राणे, सदस्य भरत तळवडेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स