ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणचे सामाजिक कार्यकर्ते रमण वाईरकर यांच्या नोटीस व मागणीची महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने घेतली दखल..!

मालवणचे सामाजिक कार्यकर्ते रमण वाईरकर यांच्या नोटीस व मागणीची महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने घेतली दखल..!

प्रकाशन: 07 Oct 2023 02:59 AM
वाचन संख्या 251

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६ तालुक्यातल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे का याची पाहणी करून अनधिकृत काम करणाऱ्या नगरपालिकांवर दंडात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमण वाईरकर यांनी महाराष्ट्र पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळास कायदेशीर नोटीस पाठवून केली होती. त्यानुसार महाराष्ट्र पर्यावरण विभागाने याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण मंडळास यावर योग्य ती कार्यवाही करून शासनास सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती श्री. वाईरकर यांनी दिली.

येथील पालिकेने सन २०१८-१९ मध्ये कचरा प्रक्रियेसाठी मोठा खर्च करत मशनरी बसविली होती. मात्र अवघ्या सहा महिन्यात ही मशनरी बंद पडली ती आजतागायत बंद आहे. या सर्व प्रकारावर व जिल्ह्यातील अन्य सहा तालुक्यातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे का याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी आणि अनधिकृत काम करणाऱ्या पालिकांवर दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल करण्यात यावा. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रमण वाईरकर यांनी महाराष्ट्र पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांना कायदेशीर नोटीस पाठविली व एका महिन्यात उत्तर देण्याची मागणी केली. अन्यथा हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली जाईल असे कळविले होते. या पार्श्वभूमीवर या नोटिशीची महाराष्ट्र पर्यावरण विभागाने दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण मंडळास यावर योग्य ती कार्यवाही करून शासनास सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती श्री. वाईरकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स