ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
देवबाग हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष उपक्रमांत विविध तालुकास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन.

देवबाग हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष उपक्रमांत विविध तालुकास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन.

प्रकाशन: 06 Oct 2023 09:06 PM
वाचन संख्या 167

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘अखिल देवबाग विकास मंडळ, मुंबई’ संचलित देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मालवण तालुकास्तरीय शालेय निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा प्रशालेच्या १९९९, १९९२ व २०२३ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुरस्कृत केल्या आहेत. तिन्ही स्पर्धा देवबाग हायस्कूल येथे संपन्न होणार आहेत.

तालुकास्तरीय शालेय निबंध स्पर्धा १४ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता होणार आहे. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात होणार आहे. यात पहिली ते चौथीया पहिल्या गटाची स्पर्धा केवळ देवबाग केंद्र स्तरीय जिल्हा परिषद शाळांमधील मुलांसाठी होणार आहे. पहिल्या गटासाठी माझे वडील, आमचे वनभोजन, माझ्या गावची जत्रा, दुसऱ्या गटासाठी माझ्या सप्नातील शाळा, देवबाग एक निसर्गरम्य पर्यटन ठिकाण, मोबाईल शाप की वरदान, तिसऱ्या गटासाठी चांद्रयान ३ भारताची एक यशस्वी मोहीम, वाचन संस्कृतीची गरज, छत्रपती शिवाजी महाराज एक जाणता राजा असे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी १२ ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे.

वक्तृत्व स्पर्धा १२ ऑक्टोबरला होणार आहे. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात होणार आहे. यात पहिली ते चौथी या पहिल्या गटाची स्पर्धा केवळ देवबाग केंद्र स्तरीय जिल्हा परिषद शाळांमधील मुलांसाठी सकाळी ११ वा. होणार आहे. तर इतर दोन गटाची स्पर्धा दुपारी २ वाजता होणार आहे. पहिल्या गटासाठी माझा आवडता ऋतू, शिवरायांचे बालपण, माझी आई, आवडता संत, दुसऱ्या गटासाठी माझे आवडते पर्यटन स्थळ, मी सैनिक झालो तर, स्वच्छ सुंदर परिसर, मला पडलेले सुंदर स्वप्न, तिसऱ्या गटासाठी मोबाईल खेळ घातक व्यसन, प्लास्टिक बंदी करण्याची गरज, स्त्री पुरुष समानता, सावरकर आणि अंदमान असे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी नावनोंदणी १० ऑक्टोबर पर्यंत करावयाची आहे.

चित्रकला स्पर्धा १० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता होणार आहे. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या तीन गटात होणार आहे. यात पहिली ते चौथी या पहिल्या गटाची स्पर्धा केवळ देवबाग केंद्रस्तरीय जिल्हा परिषद शाळांमधील मुलांसाठी होईल. पहिल्या गटासाठी माझे घर, माझ्या गावातील मंदिर, मला आवडणारा पक्षी, दुसऱ्या गटासाठी माझा सिंधुदुर्ग किल्ला, आम्ही साजरा केलेला गणेशोत्सव, वृक्षारोपण करताना मुले, शिक्षक व ग्रामस्थ, तिसऱ्या गटासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३, भारतीय सण, चांद्रयान २०२३ असे विषय देण्यात आले आहेत.

या तिन्ही स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके, चषक व प्रमाणपत्र देऊन जानेवारी २०२४ मध्ये देवबाग हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहिती व नोंदणी साठी उदय चोडणेकर – ९४२२०७९०६६, विवेक गोसावी – ९४२११४४५६४, रवींद्रकुमार घेवडे- ९९२३५६९५९८, वसंत मेस्त्री – ९४०५७८७४८८, लक्ष्मण बांगारे – ८८०६२६५५८४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स