साहित्यिक वैशाली पंडित यांच्या 'कल्याण कटोरा' कादंबरीला कोमसापचा विशेष कादंबरी पुरस्कार जाहीर ; पद्मश्री मधुमंगेश कर्णिक व मान्यवरांनी केले अभिनंदन.
देवेंद्र गावडे | उपसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या सुप्रसिद्ध साहित्यिक वैशाली पंडित यांच्या ‘कल्याण कटोरा’ या कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा साल २०२१-२०२२ साठी विशेष कादंबरी पुरस्कार जाहीर झाला आहे. मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ‘दादा महाराज प्रभु’ या संतपुरूषांच्या चजीवनावर आधारित असून वैशाली पंडित यांनी या कादंबरीत ‘जिज्ञासा’ या व्यक्तिरेखेतून दादामहाराजांचे चरित्र उलगडले आहे. ही कादंबरी कणकवलीतील श्री. विघ्नेश गोखले यांनी प्रकाशित केली आहे. दादामहाराजांच्या अनुयायांकडून तसेच मराठी वाचकांकडून ‘कल्याणकटोरा’ कादंबरीचे उत्स्फूर्त स्वागत झाले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या या पुरस्कारामुळे चरित्र कादंबरीत वेगळा प्रयोग केल्याच्या प्रयत्नाला मराठी साहित्य रसिकांकडून प्रशंसा होत असून अशी अध्यात्मिक शाबासकी मिळाल्याचा आनंद साहित्यिक वैशाली पंडित यांनी व्यक्त केला आहे.
२०२१-२२ मधील सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांचे कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डाॕ.प्रदीप ढवळ, विश्वस्त प्रमुख श्री.रमेश कीर, रेखा नार्वेकर, अरूण नेरूरकर यांनी अभिनंदन केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)