ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पाडलोसचे पख़वाज वादक गंगाराम उर्फ अमेय गावडे यांना कला सन्मान पुरस्कार.

पाडलोसचे पख़वाज वादक गंगाराम उर्फ अमेय गावडे यांना कला सन्मान पुरस्कार.

प्रकाशन: 09 Oct 2021 07:51 PM
वाचन संख्या 184

एकवीस वर्षांच्या पख़वाज वादन साधनेचा झाला गौरव

बांदा : राकेश परब : पुणे येथील ‘आर्ट बिटस् फाऊंडेशन’तर्फे कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कलाकारांना देण्यात येणारा राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस येथील पख़वाज वादक गंगाराम उर्फ अमेय तुकाराम गावडे यांना जाहीर करण्यात आला आहे. सध्याच्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर हे पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहेत.

श्री ईस्वटी संगीत विद्यालयच्या वर्गाद्वारे विद्यार्थ्यांना पख़वाज, ढोलकी, तबला वादनाचे शिक्षण देत आहेत.त्यांनी हनुमंत मेस्त्री, डॉ. दादा परब, पं. विश्वनाथबुवा पाटील, राजाराम जामसंडेकर य‍ा गुरुकडे गेली २१ वर्षे पख़वाज, ढोलकीचे शिक्षण घेत आहेत.त्यांना विविध पुरस्कार मिळविले. दिल्ली येथून ‘स्टार आँफ इंडीया २०२०, श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई पुरस्कार, तसेच विशेष कार्यक्रम – विविध भजन स्पर्धा,गीत-गीतामृत, ध्रुव संस्कृत बँड (भोपाळ),श्री शंकरा टीव्ही जागतिक भजन स्पर्धा, श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कार्यक्रमात सहभाग घेतला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स