मालवण नगरपरिषदच्या वतीने 'स्वच्छता ही सेवा' अंतर्गत राबविण्यात आलेले महाश्रमदान अभियान यशस्वीपणे संपन्न.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या वतीने शहरात केंद्र सरकारने आवाहन करण्यात आलेले महाश्रमदान अभियान संपन्न झाले. ‘एक तास , एक साथ’ स्वच्छता करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता श्रमदान राबविण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात ‘माझी माती माझा देश’ ची पंचप्रण शपथ घेऊन करण्यात आली. ‘स्वच्छता ही सेवा उपक्रम आणि स्वच्छता पंधरवडा’ अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली या मध्ये शहरातील विविध सेवाभावी संस्था व बँक कर्मचारी यांनी सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी केली.
‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेत सहभागी नागरिकांनी आपला स्वच्छता करतानाचा फोटो https://swachhatahiseva.com/ या website वर upload करून आपले सहभाग प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन मालवण नगरपरिषदे मार्फत करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)