युवासेना जिल्हा प्रमुख व जिल्हा बॅन्क संचालक सुशांत नाईक यांचा वाढदिवस साजरा ; आमदार वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग युवासेना जिल्हाप्रमुख आणि सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्क संचालक श्री. सुशांत नाईक यांचा कौटुंबिक वाढदिवस कार्यक्रम काल २९ सप्टेंबरला, कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभाशिर्वाद दिले. याप्रसंगी सर्व नाईक कुटुंबीय उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)