'होऊ दे चर्चा विचारा प्रश्न ; कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) अभियान ; जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी दिली माहिती.
शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन.
कणकवली | प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३ ला ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न..!’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यात ‘कॉर्नर सभा’ घेण्यात येणार आहेत.
६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता वैभववाडी येथे छत्रपती संभाजी राजे चौक, सायं. ४ वाजता देवगड, आणि सायं. ६ वाजता कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे या कॉर्नर सभा होणार आहेत. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, राजू शेट्ये, नंदू शिंदे, मंगेश लोके, मिलिंद साटम, जयेश नर, सचिन सावंत, शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, प्रमोद मसुरकर, उमेश वाळके, राजू राठोड,उत्तम लोके, वैदेही गुडेकर, शिवाजी राणे, स्वप्नील धुरी,नलिनी पाटील,संतोष तारी, गणेश गांवकर, हर्षा ठाकूर, सायली घाडीगांवकर हे उपस्थित राहणार आहेत.
सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी,आजी माजी लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)