ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिपी विमानतळाबाबत खा.राऊत यांच्या पाठपुराव्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांचा पत्राद्वारे प्रतिसाद

चिपी विमानतळाबाबत खा.राऊत यांच्या पाठपुराव्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांचा पत्राद्वारे प्रतिसाद

प्रकाशन: 04 Aug 2021 08:58 PM
वाचन संख्या 58

आमदार वैभव नाईक यांची माहिती

कणकवली | ब्यूरो न्यूज : चिपी  विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी खासदार विनायक राऊत करत असलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २० जुलै २०२१ रोजी खा.राऊत यांना पत्र पाठवून प्रतिसाद दिला आहे. या पत्रामध्ये त्यांनी चिपी विमानतळाच्या कार्यवाही बाबत माहिती दिली आहे.
चिपी विमानतळाचे काम गेली ५ ते ६ वर्षे रखडले होते. परंतु खासदार विनायक राऊत यांनी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विमानतळाचे काम गतीने करून घेतले.  ६ महिन्यापूर्वी DGCA समितीने चिपी विमानतळाची पाहणी केल्यांनतर सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाच्या धावपट्टीबाबत त्रुटी काढल्या होत्या. त्याबाबत देखील खा. विनायक राऊत यांनी  राज्याचे उद्योग मंत्री सुभाष  देसाई व एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून विमानतळ विकासकाकडून नवीन धावपट्टी करून घेण्यात आली. आता या विमानतळाला  DGCA समितीची परवानगी लवकरच मिळेल. खासदार विनायक राऊत यांनी  केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने  केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार विनायक राऊत यांना पत्र  लिहून प्रतिसाद दिला आहे. चिपी विमानतळाला परवानगी मिळाल्यानंतर  विमानतळ  कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रामध्ये दिली आहे. येणाऱ्या आठ दिवसात DGCA समितीची  परवानगी घेऊन लवकरच विमानतळ सुरु करण्यासाठी खा. विनायक राऊत प्रयत्नशील आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स