ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मराठी महिलेला जागा नाकारणार्या पिता पुत्राला 'मनसे' तर्फे दिली गेली 'समज..!

मराठी महिलेला जागा नाकारणार्या पिता पुत्राला 'मनसे' तर्फे दिली गेली 'समज..!

प्रकाशन: 28 Sep 2023 10:50 PM
वाचन संख्या 251

पिता पुत्रानी मागितली माफी ; महिलेने मानले मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार.

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातच मराठी माणसांची व मराठीची गळचेपी अशी विविध उदाहरणे समोर येत असतानाच सोशल मिडियावरुन काही गंभीर गोष्टी निदर्शनास येऊ लागल्या आहेत.

मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला केवळ ‘मराठी’ असल्याने व्यवसायाला जागा नाकारण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ तृप्ती देवरुखकर यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केला आणि तो व्हायरल झाला. आता या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती यांना ऑफिस थाटण्यासाठी जागा हवी होती. मात्र ‘मराठी नॉट अलाऊड’ म्हणत ही जागा नाकारण्यात आली होती. ज्या गुजराथी पिता पुत्रांनी हे केले त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तृप्ती देवरुखकर नावाच्या एका महिलेनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मुलुंड (पश्चिम) मधल्या ‘शिवसदन’ नावाच्या इमारतीमध्ये घर बघण्यासाठी त्या गेल्या होत्या. मात्र, सोसायटीचे गुजराती सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी “महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही घर देत नाही” असे सांगून नकार दिला. यातून वाद वाढला व देवरुखकर यांनी त्या बाचाबाचीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात केली. पण त्यावरूनही या बापलेकानं अरेरावी करत त्यांचा मोबाईल काढून घेतला. त्यांनी आपल्या पतीलाही मारल्याचा दावा तृप्ती देवरुखकर यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये केला आहे.

घडला प्रकार तृप्ती देवरुखकर यांनी सोशल मीडियावर टाकल्यानंतर ‘मनसे’ पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी त्याची दखल घेऊन थेट शिवसदन सोसायटी गाठली आणि दोघांनाही जाब विचारला. त्या दोघांनी नंतर माफीही मागितली.

या घटनेची दखल घेतल्या बद्दल आपण मनसे पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभारी आहोत, असे तृप्ती देवरुखकर यांनी पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करून सांगितले आहे. दरम्यान या घटनेची दखल आता महिला आयोगानेही व विविध राजकीय नेते मंडळींनीही घेतली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स