ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तलाठी भरती परीक्षा दिलेल्यांना आजपासून ८ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पहाता येईल उत्तर पत्रिका..!

तलाठी भरती परीक्षा दिलेल्यांना आजपासून ८ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पहाता येईल उत्तर पत्रिका..!

प्रकाशन: 28 Sep 2023 07:45 PM
वाचन संख्या 65

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान उत्तरपत्रिका पाहण्यासाठी (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगिनमध्ये सोय करण्यात आली आहे. उमेदवारांना काही हरकत असल्यास परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविता येणार आहे. त्यासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तर पत्रिका (Answe Key) पाहण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

उत्तरे पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरिता आक्षेप अथवा हरकत नोंदवण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराना परत केले जाणार आहे. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे. अशी माहिती परीक्षा समन्वयकांनी दिली. दरम्यान ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. संकेतस्थळावर जाहिर केलेला निकाल अंतिम असणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स