ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जि प शाळेत विद्यार्थ्यांच्या हाती पत्ते ; शाळेतील शिक्षकाने एका निवृत्त शिक्षकाला परस्पर रोजंदारीवर ठेवायचा प्रकारही आला समोर.

जि प शाळेत विद्यार्थ्यांच्या हाती पत्ते ; शाळेतील शिक्षकाने एका निवृत्त शिक्षकाला परस्पर रोजंदारीवर ठेवायचा प्रकारही आला समोर.

प्रकाशन: 28 Sep 2023 08:12 PM
वाचन संख्या 270

पनवेल | ब्युरो न्यूज : शैक्षणिक आचारसंहीतेला काल पालघरमध्ये हरताळ फासणारा प्रकार समोर आला आहे. तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तकांऐवजी पत्ते असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकाने रोजंदारीवर एका निवृत्त शिक्षकाला ठेवल्याचाही प्रकार घडला आहे. स्वत: शाळेत न जाता मजुरीवर निवृत्ती शिक्षकाला ठेवल्याची घटना घडली आहे.

वर्गातच विद्यार्थी चक्क पत्ते खेळत असल्याचे फोटो समोर आले आहेत. इतकेच नव्हे तर या शाळेतील मूळ शिक्षकानी मजुरीवर शिक्षक नेमल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला पाहायला मिळत आहे. शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार तलासरी तालुक्यात उघड झाला आहे.

तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सूत्रकार डोंगरपाडा ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा. या शाळेत केवळ १ शिक्षक आणि १४ मुले शिक्षण घेतात. तरी सुद्धा या मुलांना शिकवायचा कंटाळा येत असल्याने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकाने स्वतः घरी बसून ३०० रुपये रोजंदारीवर एका निवृत्त शिक्षकाला मुलांना शिकवायला ठेवले आहे. पण निवृत्त शिक्षकही काय करणार तोही शाळा राखत निवांत बसून असल्याने मुलेही शिक्षणाची पुस्तके सोडून वर्गातच पत्ते घेऊ डाव मांडतात.

नागरिकांच्या तक्रारीवरुन सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेला काल बुधवारी २७ सप्टेंबरला दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेत प्रमुख शिक्षक रवी कुमार सुभाष फेरे उपस्थित नसून ते गणपतीसाठी गावी गेल्याचे समजले. तसेच गावी जाताना मुलांना शिकवण्यासाठी ३०० रुपये रोजंदारीवर रामा लोतडा या निवृत्त शिक्षकाला ठेवलेले दिसून आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स