आईनेच ३९ दिवसांच्या बाळाला १४ व्या मजल्यावरून दिले फेकून ; मुलुंड येथील संतापजनक घटना.
मुंबई | ब्युरो न्यूज : मुंबईतील मुलुंड येथे आज शुक्रवारी पहाटे जन्मदात्या आईनेच आपल्या ३९ दिवसांच्या बाळाला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना घडली . या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
हशवी संकेत मेहता असे मृत बाळाचे, तर मनाली मेहता असे आरोपी महिलेचे नांव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनाली मूळ गुजरातमधील सुरतची रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वी ती मुंबईतील मुलंड परिसरात आपल्या आईकडे राहण्यासाठी आली होती. मनालीच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर ८ महिन्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर २ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यामुळे मनाली तणावात होती. तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. दरम्यान, या तणावातून गुरुवारी पहाटेच्या सुमारास मनालीने आपल्या हशवीला इमारतीच्या १४ मजल्यावरून खाली फेकले असा प्राथमिक अंदाज आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)