चिंदर येथे 'मेरी माटी मेरा देश' कार्यक्रम ; भाजप चारकोप(मुंबई) विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांचा पुढाकार.
भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती.
आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम संपन्न झाला. चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांच्या पुढाकाराने, चिंदर नागोचीवाडी युवक मंडळ मुंबई व ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गांवातील माती कलशा मधून तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या माध्यमातून शहिदांच्या स्मारकासाठी दिल्लीला पोचवणार असल्याचे यावेळी योगेश पडवळ यांनी सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टी मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर गांवचे उपसरपंच दिपक सुर्वे, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, कार्यक्रमाचे आयोजक चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ, मुंबई मंडळाचे अध्यक्ष यदुनाथ पडवळ, सेक्रेटरी दत्तात्रय पडवळ, संतोष जाधव, रवि पडवळ, परेश मांजरेकर, प्रविण पडवळ, भक्ती पडवळ, योगिनी पडवळ, समिक्षा जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)