मोटारसायकल पेट घेऊन भस्मसात..!
सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या ओटवणे येथील मांडव फातरवाडी येथिल साबाजी बिले यांच्या अंगणात अंगणातील मोटरसायकलने अचानक पेट घेतल्यामुळे ती दुचाकी (पल्सर टू ट्वेंटी) आगीत भस्मसात झाली. ही घटना आज शुक्रवारी सकाळीच ओटवणे मांडवफातरवाडीत घडली. या घटनेत १ लाखाचे नुकसान झाल्याचे सूत्रांकडून समजते.
इन्सुली येथील दत्ताराम रामा गावडे यांनी आपली पल्सर टू ट्वेंटी (MH ०५ CN ६४२४) ही दुचाकी काल गुरूवारी रात्री आपले ओटवणे येथील सासरे साबाजी बिले यांच्या अंगणात उभी करून ठेवली होती. बिले कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी पाण्याने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.मात्र तोपर्यंत या दुचाकीतील पेट्रोलच्या टाकीचे झाकण फुटून आतील पेट्रोलने पेट घेतल्यामुळे पूर्ण दुचाकी या आगीत भस्मसात झाली.
या आगीच्या प्रचंड ज्वाळामुळे घराच्या विज मीटरचे झाकण जळाले तसेच अंगणात वाळत ठेवलेले कपडेही जळाले. बिले कुटुंबीयांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारीही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. या घटनेत पल्सर मोटरसायकल जळून भस्मसात झाली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)