सुसाट कारने ४ जणांना उडवून केले जखमी..!
ब्यूरो न्यूज | मुंबई : मुंबईतील घाटकोपर असल्फा परिसरामध्ये काल गुरुवारी रात्री ११ च्या दरम्यान एका सुसाट कारने ४ जणांना उडवले. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. मुंबई महानगरपालिकेने तो पुल धोकादायक असल्याचेही जाहीर केलं आहे. मात्र तरीदेखील पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही. हा पुल धोकादायक असला तरी तो पाडला नसल्याचा किंवा पुलाला कठडे लावले नसल्याने या पुलावर सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मुंबईच्या घाटकोपर असल्फा परिसरामध्ये भरधाव वेगात जात असलेली कार पुलाला धडकली त्यामुळे मोठा अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलावर घुसून ४ पादचार्यांना धडकली, त्यानंतर ती पुलाच्या कठड्यावर आदळून अडकली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार सुसाट वेगात होती.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)