ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वागदे येथे मध्यमवयीन तरुणाची आत्महत्या..!

वागदे येथे मध्यमवयीन तरुणाची आत्महत्या..!

प्रकाशन: 20 Sep 2023 09:05 PM
वाचन संख्या 286

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नजिकच्या वागदे येथील साईनाथ चंद्रकांत साटेलकर या मध्यमवीय तरुणाने राहत्या घरात लोखंडी बारला गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ३६ वर्षांचे होते. ही घटना साधारण सायंकाळी ४ : ३० च्या आसपास घडल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

त्यांचे लहान भाऊ राजू चंद्रकांत साटेलकर यांनी या घटनेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मयत साईनाथ चंद्रकांत साटेलकर यांची पत्नी, आई व मुले आज ही सकाळी पाहुण्यांकडे गेली होती. सायंकाळी परत आल्यावर दरवाजा उघडल्यावर साईनाथ साटेलकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या आई आणि पत्नी यांनी त्यांचा लहानभाऊ राजू याला बोलावून घेतले. त्यानंतर कणकवली पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत. साईनाथ साटेलकर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्यांचे मोबाईल तपासून पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस मनोज गुरव पुढील तपास करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स