ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विकी चोपडेकर यांची गाबीत फिशरमेन फेडरेशनच्या मालवण तालुका अध्यक्षपदी एकमताने झाली निवड ; समाजासाठी विविध स्तरांवर काम करणार असल्याची चोपडेकर यांची ग्वाही.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विकी चोपडेकर यांची गाबीत फिशरमेन फेडरेशनच्या मालवण तालुका अध्यक्षपदी एकमताने झाली निवड ; समाजासाठी विविध स्तरांवर काम करणार असल्याची चोपडेकर यांची ग्वाही.

प्रकाशन: 20 Sep 2023 10:03 PM
वाचन संख्या 235

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील हाॅटेल श्री महाराजा येथे ‘गाबीत फिशरमेन फेडरेशन’ ची सभा संपन्न झाली. गाबीत मच्छिमार फेडरेशन समाजाच्या सहकार, सामाजिक, आर्थिक समस्यांना सोडविण्यासाठी राज्य स्तरावर कार्य करणार आहे. यावेळी झालेल्या सभेत मालवण तालुका अध्यक्ष म्हणून श्री. विकी चोपडेकर यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती गाबीत फेडरेशन अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली.

श्री विकी चोपडेकर हे मालवण मच्छिमार सहकारी संस्था चेअरमन असून त्यांनी स्वतःच्या निवडी बद्दल बोलताना सांगितले की येणाऱ्या काळात ट्राॅलर व्यावसायिकांच्या न्याय व हक्कांसाठी तसेच मच्छिमार समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या माध्यमातून प्रयत्न करणार असून अनेक वर्ष प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडून प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी आपण कार्य करणार आहोत.

गाबीत समाज प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १२१ किलोमीटर किनारपट्टीवर २५००० पेक्षा जास्त कुटुंबे सागरी किनारपट्टीवर राहत असून राज्याची राजधानी मुंबई इथेही हा समाज वास्तव्यास आहे. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी हा असून समाजाच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी गाबीत फिशरमेन फेडरेशन च्या माध्यमातून संघटित होऊन काम करण्याचे सभेमध्ये ठरविण्यात आले. समाजाच्या सहकार, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, डिझेल इंधनाबरोबर पेट्रोल वर अनुदान, मत्सव्यवसाय कार्यक्षेत्रात मच्छिमार शाळेची पुनः उभारणी, सीआरझेड, सागरी बंधारे रापण व्यावसायिकांचे प्रश्न ब्रेक वॉटर प्रकल्प, फिश प्रोसेसींग युनिट गाबीत समाज भवन १, फिशरमन कल्चर सेंटर सरकारी जागेत राहत्या व्यवसाय, घराच्या जागेचा प्रश्न, मच्छिमार महिलांचे प्रश्न, मासे विक्री करताना असुविधा गाबीत समाजासाठी केंद्र व राज्य सरकारच्या शासनाच्या अनेक आर्थिक योजनांमध्ये गाबीत समाजावर होणारा अन्याय दरवर्षी मच्छिमार बंदरे बंधारे योजनेसाठी मंजूर झालेला अखर्चित राहाणारा निधी, तसेच प्रामुख्याने गाबीत समाजाच्या जात पडताळणी प्रश्न अश्या अनेक विषयावर गाबीत फिशरमेन फेडरेशन कार्य करणार असूनस्थानिक प्रशासन राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कार्य केले जाणार आहे तसेच गाबीत समाजाच्या या समस्या सोडविण्यासाठी समाजाच्या अनेक संघटना सोबत घेऊन संघटीत पणे काम करण्याची भूमिका मांडली. लवकरच सर्वांच्या सहमतीने फेडरेशनची जिल्हा कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमेन फेडरेशन यांनी सांगितले यावेळी माजी नगराध्यक्ष व गाबीत समाज वेंगुर्ला अध्यक्ष श्री दिलीप गिरप देवबाग सरपंच, श्री उल्हास तांडेल, पत्रकार श्री विष्णू धावडे, गाबीत समाज जिल्हा संघटक व महिला संस्था अध्यक्ष सौ स्नेहा केरकर तारकर्ली ग्रामपंचायत सदस्य श्री जितेंद्र केरकर, टीटीडिएस अध्यक्ष श्री सहदेव साळगांवकर माजी नगरसेविका सौ पूजा सरकारे श्री वसंत तांडेल, श्री सहदेव बापर्डेकर मालवण मच्छिमार सहकारी संस्था अध्यक्ष श्री विकी चोपडेकर, श्री सुरेश बापर्डेकर, पर्यटन महासंघ मालवण महिला अध्यक्ष मेघा गांवकर, श्री सुधीर कांदळगांवकर यांनी गाबीत फिशरमेन फेडरेशन वाढीसाठी व पुढील वाटचाली संबंधी मार्गदर्शन केले यावेळी श्री गंगाराम आडकर, श्री रुपेश प्रभू, श्री मनोज खोबरेकर, श्री पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, श्री सचिन गोवेकर, श्री प्रेमानंद चोडणेकर श्री प्रसाद मेहता तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स