ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'त्या' खेळाडूला बाहेर ठेवून भारत खेळणार ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका.

'त्या' खेळाडूला बाहेर ठेवून भारत खेळणार ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका.

प्रकाशन: 19 Sep 2023 06:47 AM
वाचन संख्या 204

क्रीडा | प्रतिनिधी : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी एका पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. अनुभवी खेळाडू रविचंद्रन अश्विनने संघात पुन्हा स्थान मिळवले आहे. अश्विनच्या समावेशामुळे संघ आणखी मजबूत झाला आहे. अक्षर पटेलच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. आशिया कप दरम्यान अक्षर जखमी झाला होता. आशिया चषकासाठी निवडलेले जवळपास सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळणार आहेत. मात्र, गोलंदाज अक्षर पटेल कांगारुंविरुद्ध खेळणार नाही. या संघात श्रेयस अय्यर याच्या समावेशा बद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण एक सामना खेळल्यानंतर संपूर्ण आशिया चषकात तो जखमी खेळाडू म्हणून संघाबाहेर बाकावर बसला होता.

भारतीय संघ खालील प्रमाणे आहे.
रोहीत शर्मा ( कर्णधार), केएल राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स