ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणच्या रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचे कबड्डी व रायफल शुटींग स्पर्धेत भरीव यश.

मालवणच्या रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचे कबड्डी व रायफल शुटींग स्पर्धेत भरीव यश.

प्रकाशन: 14 Sep 2023 02:28 PM
वाचन संख्या 222

मालवण | सुयोग पंडित : क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित, कट्टा येथे १२ सप्टेंबरला संपन्न झालेल्या कबड्डी या क्रीडा प्रकारात स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न  रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने चुरशीच्या सामन्यात टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाला नमवून तालुका स्तरावर विजय संपादन केला. त्यांची आता जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. मुलींचा संघ उपविजेता ठरला. तसेच सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हा रायफल शुटींग स्पर्धेत आदेश हाक्के याने द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची विभाग स्तरासाठी निवड झाली आहे.

कबड्डी मुलांच्या विजयी संघात विघ्नेश हांडे, साईप्रसाद अटक, सागर सावंत, गौरव चव्हाण, मयुरेश परब, रितेश कुबल, रितेश परब, प्रल्हाद नाईक, प्रविण चव्हाण, विराज राणे तर मुलींच्या उपविजयी संघात निर्जरा कांबळी, क्षितिजा खरवते, आर्या किडये, रुपाली कराडे, नियती पारकर, दीक्षा सुर्वे, रुपाली कांबळे यांचा सहभाग होता.

यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शन प्रा. हसन ख़ान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे, हंबीरराव चौगले, सुमेधा नाईक, देवीदास हारगिले, उज्ज्वला सामंत, बाबुराव चौगुले व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी देखील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघांना प्रशिक्षक विवेक निवाळे व साळुंखे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स