ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत दांडी येथील सौ. निर्झरा नरेश जोशी विजेत्या.

मालवण केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत दांडी येथील सौ. निर्झरा नरेश जोशी विजेत्या.

प्रकाशन: 14 Sep 2023 01:52 PM
वाचन संख्या 168

मसुरे | प्रतिनिधी : प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मालवण केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा मालवण दांडी शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ. निर्झरा नरेश जोशी यांनी बनविलेल्या ‘मिक्स तृणधान्यांचे अप्पे’ या पाककृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये मालवण केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी व स्वयंपाकी, मदतनीस यांनी सहभाग घेतला होता. नाचणी, वरी, गहू, तांदूळ यांसारख्या विविध धान्यांचा वापर करुन पिझ्झा, मोदक, नाचणीचे घावणे, थालीपीठ, अप्पे, धपाटे, इडली, मिलेट रोल, अंबिल, नाचणी हलवा असे अनेक पदार्थ बनवून आकर्षक सजावटीसह मांडणी केली होती.

या स्पर्धेत जि.प प्राथमिक धुरीवाडा मालवण शाळेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ. काव्या किरण खडपकर यांनी बनविलेल्या ‘इडली’ या पाककृतीनेही द्वितीय क्रमांक पटकावला तर टोपीवाला हायस्कूलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौ. आनंदी रघुनाथ घोगळे यांंनी बनविलेल्या धपाटे या पाककृतीला तृतीय क्रमांक मिळाला.

केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. याला अनुसरूनच पालक व नागरिक यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण सौ.पूनम नागेश चव्हाण व सौ. प्रिया शैलेश पावसकर मयांनी केले. आरोग्य विषयक लाभ, पौष्टिकता, चव, कृती, मांडणी, इंधन बचत या मुद्द्यांआधारे परीक्षण करण्यात आले.

या स्पर्धेचे उद्घाटन मालवण गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी श्री. उदय दीक्षित, श्री.शिवराज सावंत यांच्या शुभहस्ते झाले यावेळी सौ. वीणा गोसावी, श्री.रेनाँल्ड बुतेलो सौ.सायली ढोलम, सौ.श्वेता यादव, परीक्षक सौ.पूनम चव्हाण, सौ. प्रिया पावसकर व स्पर्धक उपस्थित होते. स्पर्धेचे बक्षिस वितरण गटविकास अधिकारी श्री.आप्पासाहेब गुजर यांच्या हस्ते झाले. तालुकास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या दांडी शाळेच्या स्वयंपाकी सौ.निर्झरा जोशी यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 11
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स