ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
खारेपाटणच्या शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये  पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

खारेपाटणच्या शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

प्रकाशन: 14 Sep 2023 12:45 PM
वाचन संख्या 175

खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण येथील शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या कै. चंद्रकांत रायबागकर सभागृहात नुकताच संपन्न झाला. खारेपाटण शिक्षण संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. चे माजी वित्त व बांधकाम सभापती बाळा जठार उपस्थित होते. खारेपाटण सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ५ वी ते १२ वी इयत्तेतील मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. प्रस्ताविकामध्ये संजय सानप यांनी प्रशालेचा गौरवशाली इतिहास नमूद केला. सेक्रेटरी महेश कोळसुलकर यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सहायक शिक्षक महादेव मोटे यांनी तर मान्यवरांचा परिचय सहाय्यक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केला. सहाय्यक शिक्षिका प्रियेशा अमृते यांनी आभार प्रदर्शन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स