उद्या १४ सप्टेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्री हरी खोबरेकर यांच्या वतीने देवबाग चर्च हॉल येथे 'आधार कार्ड व इलेक्शन कार्ड' शिबीर.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग चर्च हाॅल येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख व माजी जि प सदस्य श्री. हरी खोबरेकर यांच्या वतीने उद्या गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ला आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड नांव, पत्ता, जन्मतारीख दुरुस्ती व नविन मतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र दुरुस्ती असे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ अशा वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे.
आधारकार्ड दुरुस्ती व नोंदणीसाठी ओरिजनल डाॅक्युमेंटस( मूळ कागदपत्रे) यांसह नागरिकांनी उपस्थित राहावे. तसेच मतदान ओळखपत्र( इलेक्शन कार्ड ) नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसहीत नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. हरी खोबरेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवीन आधारकार्ड नोंदणी ० ते १८ वयोगटासाठी,
१)बर्थ सर्टिफिकेट(जन्म प्रमाणपत्र)
२) सोबत आई किंवा वडील यांचे आधारकार्ड
आधार कार्ड फोटो चेंज करणे व मोबाइल नंबर लिंक करणे यासाठी,१)आधार कार्ड
२)मोबाइल नंबर
३)स्वतः व्यक्ती
लग्नानंतरचे नांव बदल करणे.
१)मॅरेज सर्टिफिकेट(विवाह नोंदणी प्रमाणपत्र)
२)सरपंच फॉर्म दाखला
३) गॅझेट असेल तर
४)फोटो
जन्म तारीख बदल करणे यासाठी
१)जन्म तारीखचा पुरावा.
२)बर्थ सर्टिफिकेट (जन्म प्रमाणपत्र)
३)पॅन कार्ड
महिलांसाठी.
१)लिव्हिंग सर्टिफकेट(शाळा सोडल्याचा दाखला).
२)बर्थ सर्टिफिकेट(जन्म प्रमाणपत्र) या पैकी काहीही एक.
आधारकार्ड वरील पत्ता बदलणे यासाठी १ )पत्त्याचा पुरावा
२)सरपंच सहीचा दाखला
नविन मतदार नोंदणी (इलेक्शन कार्ड) व इलेक्शन कार्ड दुरुस्ती यासाठी
१)आधार कार्ड झेरॉक्स(स्वयंसाक्षांकीत)
२)फोटो
३)मोबाईल नंबर
इच्छुकांनी उद्याच्या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख व माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)