ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
दुसरा दिवस..दुप्पट प्रतिसाद ; मालवणचे  माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या दोन दिवसीय 'आधार कार्ड' कॅम्पची सांगता.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

दुसरा दिवस..दुप्पट प्रतिसाद ; मालवणचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या दोन दिवसीय 'आधार कार्ड' कॅम्पची सांगता.

प्रकाशन: 13 Sep 2023 09:02 PM
वाचन संख्या 359

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी यांच्या वतीने काल १२ व आज १३ सप्टेंबरला दोन दिवसीय आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी या कॅम्पला ५५ जणांनी आधार कार्ड संदर्भातील नोंदणी , दुरुस्ती वगैरे प्रक्रियांचा लाभ घेतला.

धुरीवाडा येथील सागरी महामार्गा जवळील हाॅटेल आराध्य येथे आयोजीत या दोन दिवसीय उपक्रमाचा आज दुसर्या दिवशी १२१ जणांनी लाभ घेतला. आधार कार्ड कॅम्पचा लाभ झालेल्या सर्वांनी मंदार केणी यांचे आभार मानले व हा कॅम्प २ दिवस आयोजीत केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

या नंतर सुद्धा वेळोवेळी नागरीकांसाठी आवश्यकता असेल तेंव्हा आपण विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत राहू अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली आणि कॅम्पसाठी सहकार्य केलेल्या सर्वांची व डिजीटल तांत्रिक टीमची प्रशंसा केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स