ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांच्या थेट भेटीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे लवकरात लवकर पिक विम्याचे पैसे शेतकर्यांना देण्याचे आश्वासन.

आमदार वैभव नाईक यांच्या थेट भेटीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे लवकरात लवकर पिक विम्याचे पैसे शेतकर्यांना देण्याचे आश्वासन.

प्रकाशन: 14 Sep 2023 08:28 AM
वाचन संख्या 353

मालवण | प्रतिनिधी : आमदार वैभव नाईक यांनी काल मंत्रालयात कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांची मंत्रालयात थेट भेट घेऊन आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी पीक विम्याची रक्कम मिळावी यासाठी मागणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे १२ सप्टेंबरला, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या समवेत जिल्ह्यात आंदोलनानंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे. यावेळी त्यांच्यात आंबा व काजू पिक विमा योजनेबाबत चर्चा झाली. आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग करून गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी ना. धनंजय मुंडे यांच्याकडे केली त्याबाबतचे निवेदनही दिले. लवकरात लवकर विम्याचे पैसे देण्याचे आश्वासन ना. मुंडे यांनी आमदार वैभव नाईक यांना दिले.

चर्चेदरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी थेट वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्याशी याबाबत चर्चा करून नियोजन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना राज्य सरकारच्या हिस्स्याची विम्याची रक्कम विमा कंपनीला वर्ग करण्याचे सूचित केले आहे. आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी आमदार वैभव नाईक,शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा पाठपुरावा सुरू आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स