वारगांव जि प शाळा क्र ३ मध्ये तृणधान्य पाककला स्पर्धा संपन्न ; लॅपटॉप व शैक्षणिक साहित्याचेही वाटप.
शाळेचे विशेष देणगीदार डाॅ. विलास डहाणू यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वारगांव येथील जि प शाळा क्र. ३ येथे नुकतेच, शाळेचे देणगीदार डाॅ. विलास डहाणू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डाॅ. विलास डहाणू यांनी शाळेतील मुलांची शैक्षणिक गरज ओळखून लॅपटाॅप व शैक्षणिक साहित्य देण्याचे आश्वासन दिले होते तो कार्यक्रमही संपन्न झाला. देणगीदार डॉ. विलास डहाणू हे मुंबई येथील प्रसिद्ध सेवाभावी व तज्ञ डॉक्टर आहेत.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. माजी वित्त व बांधकाम सभापती श्री. बाळासाहेब जठार यांनी महिलांनीही सक्षम होण्यासाठी त्यांना अशा स्पर्धांमध्ये सहभागाची गरज असते व असे उपक्रम घेऊन गावातील महिलांना सक्षमीकरण करण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले. मार्गदर्शन करताना पूर्वीच्या काळातील आणि आताच्या काळातील फरक समजावून देताना ते म्हणाले पूर्वीच्या काळी स्त्रियांना चूल आणि मुलं यातच गुंतून राहावे लागत असे परंतु आता सरकारने त्यांना पुढे येण्यास मदत केली आहे. अशा प्रकारच्या उपक्रमात महिलांनी सहभागी व्हावे असा मार्गदर्शनपर सल्ला त्यांनी दिला. यावेळी साळिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. गोपाळ जाधव या कार्यक्रमास उपस्थित राहून गांवातील महिलांनाही अशा स्पर्धेत भाग घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे सांगत या आयोजनासाठी सर्व शिक्षकांची प्रशंसा केली. पाककला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपटणच्या सौ. वडाम मॅडम, व सौ. कुलकर्णी मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली.
याप्रसंगी माजी वित्त व बांधकाम सभापती मा.श्री बाळासाहेब जठार, वारगांव गावच्या सरपंच सौ. नम्रता शेटये, उपसरपंच श्री.नानासाहेब शेटये व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. किशोर मांडवकर , माजी उपसरपंच इरफ़ान मुल्ला, तंटामुक्त अध्यक्ष श्री. राजेश जाधव केंद्रप्रमुख श्री. गोपाळ जाधव तसेच वारगांव गांवचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच गांवचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. सत्यवान शिवाजी केसरकर सर यांनी केले. सौ. अर्चना अमोल तळगांवकर मॅडम, सौ. वंशिका विनायक महाडेश्वर मॅडम, श्री. रविंद्र लोकरे सर असे शिक्षक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. देणगीदार डाॅ. विलास डहाणू यांच्या दातृत्वाबद्दल शाळेने त्यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)