आज मालवणात 'शिवशौर्य यात्रा' नियोजनाच्या सभेचे आयोजन.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात, आज १३ सप्टेंबरला संध्याकाळी ४ वाजता हाॅटेल लीलांजली येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ३० सप्टेंबरला होणाऱ्या कोकण प्रांतातील दोडामार्ग ते छत्रपती शिवाजी पार्क दादर अशा ‘शिव शौर्य यात्रेच्या’ कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीला हीतचिंतक व सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे निमंत्रण तथा आवाहन अध्यक्ष श्री. भाऊ सामंत आणि प्रखंड मंत्री श्री. सुनील पोळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)