ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नांदगांव विभागातर्फे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा सत्कार ; येत्या निवडणुकांसाठी सज्ज रहायचा संदेश पारकर यांचा आवाहन संदेश.

नांदगांव विभागातर्फे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा सत्कार ; येत्या निवडणुकांसाठी सज्ज रहायचा संदेश पारकर यांचा आवाहन संदेश.

प्रकाशन: 12 Sep 2023 01:45 PM
वाचन संख्या 174

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नांदगांव विभागातर्फे नवनियुक्त जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सत्ता येणार आहे. भाजपा नेतृत्वाविरुद्ध जनमानसात चीड निर्माण झाली आहे म्हणूनच सत्ताधारी निवडणुकांपासून पळ काढत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या शिवसैनिकांनी जोमाने काम करत सज्ज रहावे असे संदेश पारकर यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की आता जिल्हाप्रमुख या नात्याने संपूर्ण ताकद शिवसैनिकांना दिली जाईल. सिंधुदुर्गात राणे भाजपाला रोखण्यासाठी गावागावातून आवाज उठवला पाहिजे. स्थानिक आमदारांचे अपयश लोकांपर्यत पोहोचवा. आगामी काळात आपण संघटीत लढा दिला तर विजय निश्चित असेल,असेही श्री.पारकर म्हणाले.

यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले,उपविभाग प्रमुख तात्या निकम, प्रदीप हरमलकर, आबू मेस्त्री, इमाम नावळेकर, शाखाप्रमुख संजय डगरे, आनंद तांबे, लक्ष्मण लोके, दीपक कांडर, अनिल नरे, मनोज लोके, अब्दुल नावलेकर, खुदबुद्दीन नावलेकर, याकुब नावलेकर भ, इरफान नावलेकर , रोहन जोशी, अंजर बटवाले, सोहेल सुभेदार, दयानंद लोके, संतोष नरे यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स