मळेवाड जकातनाका येथे अपघात..!
बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळेवाड जकातनाका येथे एका दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने काल रात्री ८:३० वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार धाकोरा येथील श्री. मनोज मुळीक हे दुखापतग्रस्त झाले आहेत.
त्यांच्या उजव्या डोळ्यावरील भागाला दुखापत झाली असून डाव्या पायालाही किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारासाठी त्यांना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथून अधिक उपचारासाठी युवा मित्रमंडळ, मळेवाड कोंडुरेच्या रुग्णवाहिकेने त्यांना गोवा बांबोळी येथे नेण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)