ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चांदोशी ग्रामपंचायत व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 'कौशल्य वृद्धी कार्यशाळा २०२३' चे आयोजन.

चांदोशी ग्रामपंचायत व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने 'कौशल्य वृद्धी कार्यशाळा २०२३' चे आयोजन.

प्रकाशन: 11 Sep 2023 05:50 PM
वाचन संख्या 144

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या चांदोशी ग्रामपंचायत येथे उद्या १२ सप्टेंबरला सकाळी १० वाजता महिलांसाठी कौशल्यवृद्धी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला गांवच्या सरपंच दिपाली मेस्त्री, उपसरपंच समीर मिराशी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गांवातील सर्व महिलांना मसाले बनवणे, निळ व फिनेल बनवणे, कपडे धुवायच्या साबणाचे द्रावण तथा लिक्विड डिटर्जंट तयार करणे या कौशल्य प्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. चांदोशी ग्रामपंचायत व श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यायचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षक श्रीमती स्नेहा कामत, व्यवस्थापक विवेक मालवणकर,
संस्थापक अध्यक्ष श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट श्री नवलराज विजयसिंह काळे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स