मोसम शाळा क्र. २ मध्ये आजी-आजोबा दिवस पारंपरिक सुसंस्कारांना उजाळा देत संपन्न.
खारेपाटण | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातल्या जि.प.प्राथमिक शाळा मोसम क्र.२ मध्ये आजी-आजोबा दिवस पारंपरिक संस्कार व मनोरंजनाद्वारे संपन्न झाला.
कार्यक्रमाचा आरंभ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप मराठे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. दरम्यान उपस्थित सर्व आजी-आजोबांचे पादप्रक्षालन करून त्यांचे औक्षण करण्यात आले. सर्वांना पुष्पगुच्छ देण्यात आला. यावेळी सर्व मुलांनी आपापल्या आजी आजोबांची ओळख करून दिली. मुख्याध्यापक विजयानंद गायकवाड यांनी लहान वयातच आजी आजोबांनी केलेल्या संस्कारांची महती स्पष्ट केली. त्यानंतर उपशिक्षिका सौ. मीनल पवार यांनी आपल्या जीवनातील आजी आजोबांचे स्थान यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची समारोप झाला.
दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे मनोरंजन करण्यासाठी विविध प्रार्थना व समूहगीते सादर केली.सर्वांनी मुलांचे तसेच शाळेच्या उंचावत चाललेल्या प्रगतीचे खूप कौतुक केले. यावेळी सरपंच सन्वेश गुरव, माजी सरपंच व जि.प.सदस्य सुरेश मराठे, ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)