साळिस्ते गांव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेश साळिस्तेकर यांची सर्वानुमते निवड ; सर्व स्तरांतून होते आहे अभिनंदन.
खारेपाटण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळिस्ते गांवाच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सुरेश साळिस्तेकर यांची सर्वानुमते निवड झाली आहे. ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. साळिस्ते ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच प्रभाकर ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेत सुरेश साळिस्तेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होतआहे.
सुरेश साळिस्तेकर हे अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात योगदान देत असून सिंधुदुर्ग जिल्हाचे भारिप उपाध्यक्ष, साळिस्ते बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)