ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आरोग्य खात्याने  जिल्ह्यातील कोरोनाचा सद्यस्थितीचा अहवाल केला जाहीर..!

आरोग्य खात्याने जिल्ह्यातील कोरोनाचा सद्यस्थितीचा अहवाल केला जाहीर..!

प्रकाशन: 08 Oct 2021 07:55 PM
वाचन संख्या 36

ओरोस | प्रतिनिधी : आज जिल्ह्यात ८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे . त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ५० हजार ८३ वर पोहचली आहे. जिल्ह्यात सध्या ९१४ रुग्ण सक्रिय असून त्यापैकी ५३ रुग्ण ऑक्सिजनवर व १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर सध्या उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आज ६१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे आज पर्यंत एकूण पॉजिटिव्ह मिळालेल्या रुग्णांची संख्या ५२ हजार ४२८ वर पोहचली आहे. आज जिल्ह्यात ८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.

तालुकानिहाय आजअखेर मृत्यू झालेले रुग्ण –

जिल्ह्यात आजअखेर १ हजार ४२९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये देवगड १७७ , दोडामार्ग ४२ , कणकवली २९५ , कुडाळ २३८ , मालवण २८४ , सावंतवाडी १९६ , वैभववाडी ८२ , वेंगुर्ला १०६ , जिल्ह्याबाहेरील ९ रुग्णांचा समावेश आहे.

तालुक्यानिहाय आजचे पॉजिटिव्ह रुग्ण –
जिल्ह्यात आज ६१ रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. यामध्ये देवगड १ , दोडामार्ग ८ , कणकवली ९ , कुडाळ १० , मालवण १८ , सावंतवाडी ९ , वेंगुर्ला ६ रुग्णांचा समावेश आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स