ग्रामपंचायत सडूरे - शिराळे यांची 'स्वछ सर्वेक्षण ग्रामीण २०२३' अंतर्गत स्वच्छ ग्रामपंचायत म्हणून झाली निवड.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या सडूरे शिराळे ग्रामपंचायत यांची ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३’ अंतर्गत निवड झाली आहे. आज ओरोस येथील शरद कृषी भवनात पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना सरपंच दीपक चव्हाण, ग्रामसेवक प्रशांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)